breaking-newsराष्ट्रिय

कुंभमेळ्यात १.२ लाख कोटींच्या महसुलाची अपेक्षा

उत्तर प्रदेशात कुंभमेळ्याच्या निमित्ताने १.२ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असा अंदाज भारतीय उद्योग महासंघाने वर्तवला आहे. १५ जानेवारीला सुरू झालेला कुंभमेळा ४ मार्चपर्यंत चालणार आहे. कुंभमेळा हा आध्यात्मिक अनुभूती देणारा सोहळा असून यंदाच्या कुंभमेळ्याने सहा लाख कामगारांना काम मिळणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने पन्नास दिवसांच्या कुंभमेळ्यासाठी ४,२०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ती २०१३ मधील महाकुंभाच्या तिप्पट आहे. आतिथ्य क्षेत्रात अडीच लाख लोकांना रोजगार मिळणार असून विमान सेवेत दीड लाख, रस्ते वाहतूक सेवेत ४५ हजार, वैद्यक पर्यटनात ८५,००० लोकांना काम मिळणार आहे. असंघटित क्षेत्रात ५५,००० रोजगार निर्माण होणार असून त्यात टॅक्सी चालक, स्वयंसेवक आदींचा समावेश आहे. उत्तर प्रदेशला यातून १,२०० अब्ज रुपये मिळणार आहेत. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, मॉरिशस, श्रीलंका, झिम्बावे या देशांचे पर्यटक येणार आहेत. राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश येथून पर्यटक येत आहेत.  २०१९ मधील कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ४२०० कोटी रुपये तरतूद केली आहे. यापूर्वी २०१३ च्या महाकुंभासाठी १३०० कोटींची तरतूद होती, असे अर्थमंत्री राजेश अग्रवालयांनी सांगितले. कुंभमेळ्याचे क्षेत्र १६०० हेक्टरवरून ३२०० हेक्टर करण्यात आले आहे. एकूण ४००० तंबू व ४०,००० एलइडी लाइट लावण्यात आले आहेत. कुंभमेळ्यासाठी २५० किमीचे रस्ते व २२ पूल उभारण्यात आल. सरस्वती, गंगा, यमुना यांच्या त्रिवेणी संगमावर प्रयागराज येथे हा कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्यात १२ कोटी लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पहिले शाही स्नान १५ जानेवारीला झाले.

पौष पौर्णिमेनिमित्त आज पवित्र स्नान

अलाहाबाद : प्रयागराज (अलाहाबाद) येथे आज (सोमवारी) पौष पौर्णिमेला गंगा, यमुना व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर दुसरे पवित्र स्नान होत असून त्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. पौष पौर्णिमा हा कुंभमेळ्यातील कल्पवासाचा प्रारंभ मानला जातो. शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी सांगितले,की पौष पौर्णिमा हा हिंदूंसाठी महत्त्वाचा दिवस असून याच दिवशी देशाच्या विविध भागातील लोक संगमावर येऊन स्नान करतील.या वेळी कल्पवास म्हणजे काटकसरीचा काळ सुरू होतो. पौष हा कृष्णाचा महिना मानला जातो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button