breaking-newsआंतरराष्टीय
किम यांचे ट्रम्प यांना उत्तर कोरिया भेटीचे निमंत्रण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/1010kimjongunexgirlfriend-1.jpg)
सेऊल – उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सिंगापुर येथे झालेल्या ऐतिहासिक भेटीच्यावेळी किम जोंग यांनी ट्रम्प यांना उत्तर कोरिया भेटीचे निमंत्रण दिले आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. त्याच वेळी स्वत: ट्रम्प यांनीही किम जोंग यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले आहे असे वृत्त केसीएनए या कोरियन वृत्त संस्थेने दिले आहे.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या निमंत्रणाला विधायक प्रतिसाद दिला आहे. त्यातून या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एखाद्या भेटीची शक्यता निर्माण झाली आहे. सिंगापुर भेटीच्यावेळी ठरलेल्या तपशीलानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आणखी वाटाघाटी होण्याची शक्यता आहे.