breaking-newsआंतरराष्टीय

किम जोंग चीनच्या दौऱ्यावर…

बिजींग – अमेरिकेच्या अध्यक्षांची ऐतिहासिक चर्चा केल्यानंतर उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग हे आज पासून दोन दिवसांच्या चीन भेटीवर जात आहेत. गेल्या मार्च महिन्यापासूनची जोंग यांची ही तिसरी चीन भेट आहे. साऱ्या जगाने उत्तर कोरियावर निर्बंध लागू केले असले तरी चीनने कायमच त्यांची पाठराखण केली आहे.

किम जोंग यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांशी चर्चा करण्यास सुरूवातीला चीनचाही विरोध होता. त्यामुळे ट्रम्प आणि जोंग यांची भेट डळमळीत झाली होती पण नंतर चीननेच हिरवा कंदील दाखवल्यानंतर जोंग हे ट्रम्प यांच्या भेटीला तयार झाले होते. या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर जोंग हे चीनच्या दौऱ्यावर जात असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व दिले जात आहे.

जगाने लादलेल्या आर्थिक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून काही आर्थिक मदत मागण्यासाठी किम जोंग चीनला जात आहेत असे सांगितले जात असले तरी त्यांच्या भेटीचा नेमका उद्देश मात्र अजून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button