काश्मीर बाबत पाकिस्तान खोट्या स्टोऱ्या पसरवत आहे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/india-pakistan-1-4.jpg)
- संयुक्तराष्ट्रात भारताचा आरोप
संयुक्तराष्ट्रे – साऱ्या दक्षिण अशियातील दहशतवाद्यांचा अड्डा बनलेला पाकिस्तान काश्मीर विषयावर खोटी माहिती पसरवून भ्रामक वातावरण तयार करीत आहे असा आरोप भारताने संयुक्तराष्ट्रांमध्ये केला आहे. संयुक्तराष्ट्रात पाकिस्तानने पुन्हा काश्मीरचा विषय उपस्थित केल्यानंतर त्याला प्रत्त्यत्तर देताना भारताने हा आरोप केला.
पाकिस्तानी प्रतिनिधींनी म्हटले आहे की काश्मीरात मानवाधिकाराचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याची बाब मानवाधिकार उच्चायुक्त्यांच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. त्यावरून काश्मीरात आत्तापर्यंत केवळ फार्सच सुरू होता हे स्पष्ट झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे. काल आमसभेत पाकिस्तानी प्रतिनिधींनी हा आरोप केल्यानंतर त्याला भारताने उत्तर दिले.
भारताच्यावतीने बाजू मांडताना संदीपकुमार बय्यपु म्हणाले की जे राष्ट्र स्वताच दहशतवादाचा अड्डा बनले आहे ते काश्मीर बाबत सतत खोटी माहिती पसरवत आहेत. यापुर्वीही त्यांनी काश्मीर विषयी खोटी माहिती पसरण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाहीं म्हणून त्यांनी पुन्हा हे उद्योग सुरू केले आहेत. त्यांच्या प्रश्नांना पुन्हा उत्तरे देण्यात भारताला स्वारस्य नाही.