Breaking-newsराष्ट्रिय
काश्मीरातील जंगलात दडवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त
जम्मू – जम्मू काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यातील एका जंगल भागात दहशतवाद्यांनी लपवलेला मोठा शस्त्र साठा लष्कराच्या हाती लागला आहे. त्यात 11 आयईडी बॉंबसह अन्यही अनेक शस्त्रे व स्फोटके सापडली आहेत. सूत्रांनी सांगितले की तेथे या बॉंबसह दोन एके रायफली, तिन पिस्तुले, चार चिनी बनावटीचे हातबॉंब, रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड आणि पाकिस्तानी चलन अशी सामग्री सापडली आहे.
जेथून ही सामग्री जप्त करण्यात आली आहे तो भाग प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक मेंधर सेक्टर मध्ये आहे. ही सारी सामग्री पाकिस्तानातून आयात करण्यात आली आहे. ती जंगलात लपवून नंतर दहशतवाद्यांकडे दिली जाते.
सापडलेल्या सामग्रीत रायफली आणि पिस्तुलांना लागणाऱ्या गोळ्यांचा मोठा साठा आणि 20 डिटोनेटर्सचाही समावेश आहे. येथे पाकिस्तानी चलनही सापडले आहे पण ते साडेसोळा हजार रूपयांचे आहे.