breaking-newsराष्ट्रिय

काश्मीरमध्ये नजरकैदेतील नेत्यांचे तीन कोटींचे हॉटेल बिल!

जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर ज्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे त्या ३४ जणांना थंडीच्या दिवसात सेंटॉर हॉटेलमधून हलवण्यात येणार असून या हॉटेलमध्ये हीटरची व्यवस्था चांगली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. थंडी वाढू लागली असून त्याचा परिणाम राजकीय नेत्यांच्या प्रकृतीवर होऊ  लागला आहे.

सध्या नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी व पीपल्स कॉन्फरन्स या पक्षाचे नेते नजरकैदेत असून त्यांना सेंटॉर हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. नयनरम्य दल सरोवराच्या किनारम्य़ावर असलेल्या या हॉटेलमध्ये त्यांचे ४ ऑगस्टपासून वास्तव्य आहे. या नेत्यांना हलवण्याच्या घटनाक्रमाबाबत जाणकार सूत्रांनी सांगितले,की सेंटॉर हॉटेल हे भारतीय पर्यटन महामंडळाच्या मालकीचे आहे व त्यांनी या नेत्यांच्या ९० दिवसांच्या निवासाचा खर्च २.६५ कोटी दाखवला आहे व तो आता सरकारला द्यावा लागेल. प्रशासनाने मात्र सेंटॉर हॉटेलने लावलेले बिल फेटाळले असून या हॉटेलचे स्थानबद्धतेसाठी कोठडीत रूपांतर केले होते, त्यामुळे सरकारी दराने पैसे देण्यात येतील असे म्हटले आहे. या हॉटेलचा दर सरकारने दिवसाला ८०० रुपये जाहीर केला आहे, तर हॉटेल व्यवस्थापनाने तो दिवसाला पाच हजार रुपये लावला आहे. थंडीत तापमान शून्याच्या खाली जात असल्याने या नेत्यांना हॉटेलमधून दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. नवीन व्यवस्थेनुसार थंडीत प्रशासनाचे मुख्य केंद्र हे श्रीनगरहून जम्मूला हलवण्यात आले आहे. रेसिडेन्सी रोडवरील आमदार निवासात या राजकीय  कैद्यांना हलवले जाण्याची शक्यता आहे. सध्या तेथे जम्मूचे माजी आमदार राहतात. माजी आमदारांनी आमदार निवास सोडण्यास नकार दिला असून काही इतरही लोकप्रतिनिधी तेथे रहात आहेत. त्यांनी मात्र दुसरीकडे खास हॉटेल शोधण्यास सुरूवात केली आहे.

उच्च सुरक्षा असलेल्या छावणी भागातही राजकीय कैद्यांसाठी जागा  शोधणे सुरू असून पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन, नॅशनल कॉन्फरन्सचे अली महमद सागर, पीडीपीचे नइम अख्तर व माजी आयएएस अधिकारी शहा फैजल यांच्यासाठी जागा शोधण्याचे काम चालू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button