Breaking-newsराष्ट्रिय
काश्मीरच्या बहुसंख्य भागांमध्ये बर्फवृष्टी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/srinagar-snowfall.jpg)
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील पठारी प्रदेशांसह काश्मीरच्या बहुसंख्य भागांमध्ये बुधवारी रात्री बर्फवृष्टी झाल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. बुधवारी काश्मीर खोऱ्यातील पठारी प्रदेश आणि अत्यंत उंच ठिकाणी बर्फवृष्टी झाली. रात्रभर बर्फवृष्टी सुरू होती. काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्य़ातील गुलमर्ग येथील स्की-रीसॉर्ट येथे रात्री दहा इंच बर्फवृष्टी झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनंतनाग जिल्ह्य़ातील पहलगाम पर्यटनस्थळी ११ इंच बर्फवृष्टी झाली तर काझिगुंद आणि कोकेरनाग येथे अनुक्रमे पाच आणि सात इंच बर्फवृष्टी झाली.
श्रीनगर आणि आजुबाजूच्या परिसरामध्ये दोन सेंमी. बर्फवृष्टी झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जोझिला पास, अमरनाथ गुंफा, सोनमर्ग, गुरेझ आणि मोघल मार्ग येथेही बर्फवृष्टी झाल्याचे वृत्त आहे.