Breaking-newsराष्ट्रिय
कर्नाटकात पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/petrol-pumps-pixabay-5.jpg)
बंगळूरू : इंधनदरवाढीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. राज्यात सर्वत्र अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राच्या सीमेवरील कर्नाटक राज्यात मात्र पेट्रोल आठ रुपये, तर डिझेल दोन रुपये १५ पैशांनी स्वस्त आहे. त्यामुळे सीमेवरील वाहनधारकांसह वाहतूक व्यावसायिक कर्नाटक राज्यातच टाक्या फुल्ल करीत आहेत.
उमरगा तालुका कर्नाटक सीमेलगत असल्याने १५ किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्यातील पेट्रोल पंप आहेत. तेथे पेट्रोलचा दर ७७ रुपये ९० पसे आहे, तर उमरगा तालुक्यात एका लिटरसाठी ८५ रुपये ४० पसे मोजावे लागतात. कामानिमित्त कर्नाटकात गेलेले वाहन चालक आठ रुपयाने प्रतिलिटर दर कमी असल्याने पेट्रोल भरून येतात. त्यामुळे उमरगा येथील पेट्रोलपंप चालकांचा व्यवसाय मंदावला आहे.