Breaking-news
कर्नाटकमधील जनतेसाठी लढू-राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/congress-defeats-.jpg)
नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाला मतदान करणाऱ्या कर्नाटकमधील मतदारांचे आभार मानले.
यावेळी त्यांनी कर्नाटकमधील जनतेसाठी लढण्याची ग्वाही दिली. निवडणुकीत कॉंग्रेससाठी निष्ठेने कार्य केलेल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांच मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया राहुल यांनी ट्विटरवरून दिली.