Breaking-news
कर्नाटकचा गड राखण्यात कॉंग्रेसला अपयश
नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेसच्या पराभवानंतर भाजपने दिलेला ‘काँग्रेस मुक्त भारत’चा नारा खरा होताना दिसतोय. ३४ वर्षापूर्वी अवघे दोन खासदार असलेल्या भाजपने एकापाठोपाठ एक विजय मिळवत देशातील २२ राज्यांत सत्ता निर्माण केली आहे. त्यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं आव्हान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर उभं आहे.
कर्नाटकमध्ये भाजपनं आघाडी घेतली असून बहुमताच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे या विजयाबरोबरच भाजप आघाडीची २२ राज्यात सत्ता निर्माण झाली आहे. १५ राज्यात भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले असून त्यात आता कर्नाटकची भर पडल्यानं हा आकडा १६ वर जाणार आहे.