Breaking-newsआंतरराष्ट्रीय
कर्तृत्व स्त्री शक्तीचे : गुरसोच कौर यांनी अमेरिकेत वाढवली भारताची शान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/GURUMIT-2.jpg)
नवी दिल्ली : अमेरिकन पोलीस दलात अधिकारी पदावर नियुक्त होणाऱ्या गुरसोच कौर या पहिल्या भारतीय महिला पगडीधारक पोलीस झाल्या आहेत. त्यांची न्यूयॉर्क पोलीस विभागामध्ये सहाय्यक पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, गुरसोच कौर यांच्या नियुक्तीनंतर भारताचे केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गुरसोच कौर यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा देत, कौर यांची वाटचाल प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी न्यूयॉर्क पोलीस अकॅडमीमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या या नियुक्तीने तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावली गेली आहे. सध्या न्यूयॉर्क पोलिसांमध्ये जवळपास १६० भारतीय शिख अधिकारी आहेत. त्यात आता गुरसोच कौर यांच्या नियुक्तीची भर पडली आहे.