breaking-newsराष्ट्रिय

ओडिशातही काही ठिकाणी पुर्ण प्लॅस्टिक बंदी

भुवनेश्‍वर – येत्या दोन वर्षात ओडिशा पुर्ण प्लॅस्टिक मुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही भागात येत्या 2 ऑक्‍टोबर पासून पुर्ण प्लॅस्टिक बंदी लागू केली जाणार आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी हीं महिती दिली.

व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे आपल्या राज्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की येत्या 2 ऑक्‍टोबर पासून पुरी शहर आणि राज्यातील सर्व महापालिका हद्दीत पुर्ण प्लॅस्टिक बंदी जारी करण्यात येईल.

प्लॅस्टिक बंदी लागू होणाऱ्या शहरांमध्ये भुवनेश्‍वर, बेहरमपुर, समलापुर, कटक, राउरकेला या शहरांचा समावेश असेल. त्यानंतर संपुर्ण राज्यामध्ये येत्या दोन वर्षात टप्प्याटप्प्याने प्लॅस्टिक बंदी लागू केली जाईल अशी घोषणा त्यांनी केली. या कार्यासाठी त्यांनी सर्व संबंधीत मंत्रालयाना कामाला लावले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button