Breaking-newsराष्ट्रिय

एकीकडे ट्रम्प यांच जल्लोषात स्वागत,तर दुसरीकडे त्यांच्या प्रतिमेचे दहन…

अहमदाबाद येथे काल म्हणजे 24 फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.त्यांच्यासाठी अगदी जय्यत तयारी करण्यात आली होती…अनेक स्थळांना डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्निने भेट सुद्धा दिली..मात्र त्याचवेळी दुसरीकडे डाव्या संघटनेने ट्रम्प यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केलं…

कोलकाता येथील डाव्या संघटनेने ट्रम्प यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केलं… युद्ध भडकवणारे, वसाहतवादी, गँगस्टर अशी टीका करणारे फलक आंदोलकांच्या हातात होते … ‘ट्रम्प गो बॅक’ अशा घोषणा डाव्या संघटनांचे आंदोलक करत होते.

ट्रम्पविरोधी मोर्चात महिला, विद्यार्थीही सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात ट्रम्पविरोधी फलक होते. आता या आंदोलनाचा ट्रम्प यांच्या दौ-यावर सध्या तरी काही परिणाम नाही दिसून आलेला नाही…मात्र या दौ-यानंतर आंदोलनाचा अमेरिकेच्या आणि भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर काही नकारात्मक परिणाम होईल का हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे…

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button