इलेक्ट्रिक वाहनांसाठी दर तीन किमी अंतरावर चार्जिंग पॉईंट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/EV-651x420.jpg)
नवी दिल्ली : केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी शहरात दर तीन किमी अंतरावर चार्जिंग पॉईंट उभं करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासोबतच राष्ट्रीय महामार्गांवर ५० किमी अंतरावर हे चार्जिंग स्टेशन उभे करण्यात येणार आहेत. हे स्टेशन्स उभे करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारवर असणार आहे.
महापालिका प्रशासन सरकारला जमीन उपलब्ध करुन देण्यात मदत करेल, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळेल. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “पुढील तीन ते पाच वर्षात जवळपास ३० हजाराहून जास्त स्लो चार्जिंग आणि १५ हजाराहून जास्त फास्ट चार्जिंग स्टेशन बसवण्यात येणार आहेत. यामध्ये किमान दोन हायस्पीड चार्जिंग स्टेशन पॉईंट्स असतील. शहरांमध्ये प्रत्येक तीन किमी अंतरावर एक फास्ट चार्जिंग पॉइंट असेल. याचप्रकारे महामार्गावर प्रत्येक ५० किमी अंतरावर एक चार्जिंग पॉईंट असेल”.