breaking-newsआंतरराष्टीय

इराकच्या लष्करी तळावर पुन्हा रॉकेट हल्ला

इराण-अमेरिकेतील वादामुळे मध्य पूर्व आशियात तणाव निर्माण झालेला असताना इराकमधील लष्कराच्या तळावर पुन्हा एकदा रॉकेट झालेला आहे. ताजी लष्कारी तळावर रॉकेट डागण्यात आले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही. दोन दिवसांपूर्वीच बगदादपासून साधारण ७० किलोमीटर उत्तरेस स्थित असलेल्या अल-बलाद हवाईतळावर आठ रॉकेट सोडण्यात आलेले होते.

इराकची राजधानी बगदादपासून उत्तरेस ८५ किमी अंतरावर असलेल्या ताजी लष्करी तळावर मंगळवारी दोन रॉकेट हल्ले करण्यात आलेले होते. कत्युशा रॉकेटनं या तळाला निशाणा बनवण्यात आलं आहे. या परिसरात अमेरिकी सैन्यातील जवानांसह इतर देशातील जवानांच्या निवासस्थानं आहेत. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं ‘अलजजिरा’नं म्हटलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button