breaking-newsआंतरराष्टीय
इम्रान खानच्या पत्नीने मानले जनतेचे आभार!
इस्लामाबाद :इम्रान खानच्या पत्नी बुशरा मनेका यांनी संपूर्ण पाकिस्तानी जनतेला जनतेच्या विकासासाठी काम करणाऱ्या इम्रान खान यांची आणि त्यांच्या पक्षाची निवड केल्याप्रकरणी धन्यवाद दिले.
पाकिस्तान तेहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) हा पक्ष केंद्रात सत्ता स्थापनेचा विचार करत आहे. काल दिलेल्या भाषणात पक्ष प्रमुख इम्रान खान यांनी विजयाची स्वतःच घोषणा केली. पीटीआयला निवडणुकात सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तरीदेखील मतमोजणीला असलेल्या कमी गतीमुळे याला वेगळे स्वरूप येऊ शकते.
“सर्व शक्तिमान अल्लाह यांनी जनतेला जनतेच्या हक्कांची काळजी करणारा नेता दिला.” अश्या स्वरूपाचे विधान बुशरा यांनी टीव्ही चॅनेल समोर केले. विधवा, अनाथ आणि गरिबांना शुभेच्छा पीटीआयचे प्रमुख हे पाकिस्तानी जनतेचे रक्षक ठरतील असेही त्या पुढे म्हणाल्या.
इम्रान खान हे त्यांच्या भाषणाच्या वेळी म्हणाले की, ” मी माझे पाकिस्तान संबंधीची स्वरूप जे माझ्या मनात आहे ते आपल्यासोबत वाटू इच्छितो- ते त्याच प्रकारचे राज्य असेल जे मदिनामध्ये असते, जेथे विधवा आणि गरिबांची योग्य ती काळजी घेतली जाते.”
खान यांची माजी ब्रिटिश पत्नी जेमिमा यांनी काल इम्रान खान यांचे अभिनंदन केले होते आणि त्यांच्या दृढतेची, विश्वासाची, पराभव न स्विकारण्याच्या गुणांची वाहवाही केली होती. पहिली पत्नी जेमिमासोबत घटस्फोट झाल्यानंतर इम्रान यांनी बीबीसी प्रेसेंटर रेहम खान यांच्याशी दुसरा विवाह केला होता. इम्रान खान यांच्या दोन्ही पत्नी ब्रिटिश होत्या. बुशरा मनेका या त्यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत.
इम्रान खान यांनी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे १९७१ ते १९९२ पर्यंत प्रतिनिधित्व केले. ते १९९२ मध्ये विश्वचषक पटकावणाऱ्या पाकिस्तान संघाचे कर्णधारदेखील होते.