Breaking-newsराष्ट्रिय
आम आदमी पक्षाची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/aap-6-..jpg)
नवी दिल्ली – लाभाचे पद स्वीकारल्याच्या कारणावरून आम आदमी पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी ज्या तक्रारदाराने निवडणूक आयोगाकडे केली आहे त्याची उलट तपासणी करण्याची अनुमती आम्हाला द्या अशी मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती पण ती मागणी आयोगाने फेटाळली आहे. अशी उलट तपासणी घेण्याची गरज नाही असे आयोगाने म्हटले आहे.
लाभाचे पद स्वीकारल्याच्या कारणावरून आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सध्या निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. त्यावेळी आपच्यावतीने ही मागणी करण्यात आली होती. प्रशांत पटेल नावाच्या तक्रारदाराने आम आदमी पक्षाच्या या 20 आमदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे.