Breaking-news
आणखी एक धुळीचे वादळ येण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/dust-storm-.jpg)
आगामी 48 तासांमध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांना धुळीच्या आणखी एका वादळाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वादळाचे चक्री स्वरुप लक्षात घेता अशाच प्रकारचे वादळ पुन्हा येण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. पुन्हा येणाऱ्या वादळामुळे वाऱ्यांचा वेग आगामी 48 तासात वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः राजस्थानमधील करौली आणि ढोलपूर या सीमेवरच्या जिल्ह्यांना या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान शास्त्र संस्थेतील वैज्ञानिक हिमांशू शर्मा यांनी सांगितले. या काळामध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.