Breaking-newsराष्ट्रिय
अवघड वळणावर बस दरीत कोसळून ११ प्रवाशांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/bus-accident.jpg)
जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात शनिवारी सकाळी एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त बस लोरानवरुन पूँछच्या दिशेने चालली असताना मंदी प्लीरा येथे एका अवघड वळणावर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस १०० फूट खोल दरीत कोसळली.
घटनास्थळी युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.