Breaking-newsराष्ट्रिय
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या १७ नराधमांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/08/rape.jpg)
चेन्नई: चेन्नई येथे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी १७ नराधमांना अटक करण्यात आली आहे. चेन्नई शहरातील एका अपार्टमेंट मधील सदनिकेत वास्तवास असणाऱ्या कुटुंबातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत हा किळसवाणा प्रकार घडला असून आरोपींपैकी बहुतेक जण सुरक्षा रक्षक, प्लम्बर, लिफ्टमन व अपार्टमेंट मध्ये छोटी-मोठी काम करणारे नोकर आहेत.
पीडित अल्पवयीन मुलीने आपल्यावर झालेल्या पाशवी अत्याचाराची माहिती तिच्या बहिणीला दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी चैनई पोलिसांकडे १५ जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार पीडित अल्पवयीन मुलीने आत्तापर्यंत तिच्यावर अत्याचार केलेल्या १७ जणांची ओळख पटवली आहे. आतापर्यंत ओळख पटलेल्या १७ आरोपींपैकी ६ आरोपींनी अत्याचार केला असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी हे प्रकरण ‘स्पेशल-केस’ म्हणून हाती घेतले असून पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे कसून तपास करत आहेत.