Breaking-news

अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील जिना यांच्या फोटोचा वाद पेटला

लखनऊ : अलीगढ मुस्लिम विद्यापीठात पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांचा फोटो लावण्यावरुन निर्माण झालेला वाद चिघळला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पाच दिवसांसाठी वर्गावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून जिल्हा प्रशासनाने विद्यापीठातील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

जिना यांचा फोटो हटवण्यात यावा अशी मागणी होत असताना विद्यार्थी मात्र हा फोटो इतिहासाचा भाग असून हटवणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. जिना आमच्यासाठी आदर्श नसले, तरी ते भारताच्या इतिहासाचा भाग आहेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. वाद वाढवायचा नसेल तर विद्यार्थी संघटना आणि विद्यापीठ प्रशासन अधिकाऱ्यांनी बसून चर्चा करणं गरजेचं आहे असं विद्यार्थ्यांचं मत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button