अमेरिकेत पुन्हा ‘शटडाऊन’ , 8 लाख सरकारी कर्मचाऱ्यांपुढे पेच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/trump.jpg)
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीमेवर भिंत बांधण्यासाठी पैशांचा हट्ट धरल्याने पुन्हा एकदा रिपब्लिकन व डेमोक्रॅट नेत्यांमध्ये कोंडी निर्माण झाली आहे. सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिकी कॉंग्रेस संस्थगित झाल्याने अमेरिका सरकारचे “शटडाऊन’ आजपासून सुरू झाले.
ट्रम्प यांच्या मागणीवर अमेरिकी कॉँग्रेसमध्ये शुक्रवारी रात्री बारापर्यंत खर्चाला मंजुरीबाबत घमासान चर्चा सुरू होती. मात्र, रिपब्लिकन सरकारच्या अनेक खर्चांना डेमोक्रॅटिक सदस्यांचा विरोध होता. कॉंग्रेसमध्ये एकमत न झाल्याने कोणत्याही खर्चाच्या मंजुरीशिवाय सभागृह संस्थगित करण्यात आले. त्यामुळे रात्री बाराचा ठोका पुढे सरकताच अनेक मुख्य संस्थांचे कामकाज बंद झाले. अनेक सरकारी संस्थांना कामकाज चालविण्यासाठी पैसेच न मिळाल्याने पुढील काही काळासाठी अमेरिका सरकार अंशत: “बंद’ असणार आहे.
या शटडाऊनमुळे अमेरिकेतील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण होणार आहे. त्यांना या शटडाऊनच्या काळासाठी विनावेतन काम करावे लागणार आहे. ऐन नाताळाच्या हंमागात ही स्थिती ओढवल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी पसरली आहे. हे या वर्षातील तिसरे “शटडाऊन’ असून ते किती काळ चालेल, ते अद्याप स्पष्ट नाही. या शटडाऊनचा पहिला जोरदार फटका अमेरिकेतील शेअर बाजाराला शुक्रवारी बसला. वॉल स्ट्रीटवरील बाजाराने जबर घसरण अनुभवली. सन 2008 नंतरची ही सर्वांत मोठी घसरण होती.
बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी 5 अब्ज डॉलर्सची मागणी ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसकडे केली आहे.
शटडाऊन’ म्हणजे काय?