अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या ४५ लाखांवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/tdy_news_molly_coronavirus_200507_1920x1080.focal-760x428-1.jpg)
न्यूयॉर्क – जगभरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसल्याचे दिसत आहे.
अमेरिकेतील कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून कोरोनाबिधितांच्या संख्येने ४५ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहितीदेखील समोर आली.
तसेच वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसारदेखील अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून मृतांची संख्याही दीड लाखांवर गेल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत आतापर्यंत १ लाख ५३ हजार ४४७ जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या २४ तासांमध्ये १ हजार २६७ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५० हजार नव्या रुग्णांचीही नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोनाचा सर्वाधित फटका बसलेल्या देशांच्या यादीत ब्राझिल हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत २५ लाख कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ९० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत ब्राझिलमध्ये १ हजार ५०० जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली