breaking-newsआंतरराष्टीय
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे भीषण आग;तब्बल १२ हजार एकरांत लागली आग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/fire-in.jpg)
कॅलिफोर्निया – अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे भीषण आग लागली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही आग तब्बल १२ हजार एकर परिसरात पसरली आहे. आगीमुळे ८ हजाराहून अधिक लोकांना रिव्हरसाइड काउंटीमधून बाहेर काढण्यात आले आहे. स्थानिक लोक या प्रकाराला अॅपल फायर म्हणतात . ही आग शुक्रवारी एका छोट्या स्वरूपामध्ये सुरू झाली आणि नंतर या आगीचे लोळ तब्बल ७५ मैल दूरपर्यंत पसरले.
लॉस एंजेलिसच्या पूर्वेस ७५ मैलांच्या पूर्वेस असलेल्या चेरी व्हॅलीमध्ये सर्वप्रथम आग लागली. रिव्हरसाइड काउंटी अग्निशमन विभागाने आज रविवारी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की अॅपल फायर आता १२हजार एकर परिसरात पसरली आहे. लोकांना बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.