अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी;डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Donald-Trump-1-1-1.jpg)
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची, तर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून माईक पेन्स यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर यंदा ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रेटिक पार्टीकडून माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन मैदानात आहेत.
रिपब्लिकन पार्टीच्यावतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीसाठी सोमवारी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील राष्ट्राध्यक्षपदासाठी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बिडेन यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, व्हाईट हाऊसचे सल्लागार केलीनेन कॉनवे यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचे कारण सांगत ट्रम्प यांच्या प्रशासनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी दोन महिने आधी कॉनवे यांचं सोडून जाणं ट्रम्प यांच्यासाठी झटका मानला जात आहे. कारण कॉनवे त्यांची राजकीय आणि धोरणात्मक मते मांडणारे एक सक्षम प्रवक्ते होते.