अमेरिका-इराण वादाची लागणार भारताला झळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/flag-.jpg)
तेहरान (इराण) – आण्विक करारामुळे इराण आणि अमेरिक यांच्यातील वाद चिघळला आहे आणि अमेरिकेने करारातून बाहेर पडणंयाचा निर्णय घेत इराणवर आर्थिक प्रतिबंध लागू करण्याचे ठ्रवले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाबाबत भारताने आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे आणि आपण या प्रकारच्या जोरजबरदस्तीच्या विरोधात असल्याचे भारताने अमेरिकेला कळवले आहे.
भारताच्या विरोधाचे कारण अगदी स्पष्ट आहे. भारताच्या कच्च्या तेलाची गरज पूर्ण करणारा इराण हा एक महत्त्वाचा देश आहे सौदी अरब आणि इराक यांच्यानंतर इराणकडूनच आपण मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करतो. जर इराणवर आर्थिक प्रतिबंध लागू झाले, तर भारताला इराणकडून कच्च्या तेलाचा पुरवठा होण्यात अडचणी येतील. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होईल आणि त्याचा विपरीत परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल,
हा एक भाग झाला.
दुसरा प्रश्न आहे चाबहार बंदराबाबतचा. भारत इराणमधील चाबहार बंदराचे काम करत आहे त्याचा पहिला बर्थ तयार झाला आहे. आणि त्याचे संचलन भारतीय कंपनीकडे देण्यात आले आहे. चाबहारचे राजकीय महत्त्वदेखील मोठे आहे. चाबहार बंदरामुळे मध्य एशियातील अनेक देशांन आपली उत्पादने पाठवू शकेल. परंतु अमेरिका इराण वादाने चाबहार बंदरासाठी निधी जमा करताना भारताला अडचण येऊ शकणार आहे.
एकून काय, तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याची हानी !