Breaking-newsआंतरराष्ट्रीय
अमेरिका आणि तालिबानमध्ये ऐतिहासिक शांतता करार, १४ महिन्यांत अफगाणिस्तान सोडणार

दोहा | महाईन्यूज
गेल्या १९ वर्षांपासून युद्धात होरपळत असलेल्या अफगाणिस्तानमध्ये शा्ंतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, तालिबाने शांतता कराराचे पालन केल्यास येत्या १४ महिन्यांच्या आत अमेरिकाअफगाणिस्तानमधून आपल्या सर्व सैनिकांना माघारी बोलावेल, अशी घोषणा अमेरिकेने केलेली आहे.
अमेरिका आणि तालिबान यांच्यात कतारची राजधानी दोहा येथे आज हा ऐतिहासिक शांतता करार झाला. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यावर दोन्ही पक्षांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. अमेरिकी फौजा अफगाणिस्तानमधून माघारी हटल्यानंतर तालिबान सशस्त्र संधर्ष सोडून देईल, असे या संयुक्त निवेदनात म्हटलेले आहे.





