Breaking-news
अमित शहांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर अखिल गोगोईंना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/akhil-gogoi.jpg)
गुवाहाटी – भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या आसाम दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शेतकरी नेते आणि माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते अखिल गोगोई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिटीझन्सशिप ऍमेंडमेंड विधेयकाला त्यांचा विरोध असून त्यांनी राज्यातील नागरीकांना अमित शहा यांच्या भेटीच्यावेळी त्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवून विरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे त्यांना प्रतिबंधत्मक उपाय म्हणून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
याच संबंधात निदर्शने करताना त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आली असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आम्ही शांततापुर्ण मार्गाने निदर्शने करीत असताना आम्हाला भाजप सरकारने बेकायदेशीरपणे अटक करून येथे जुलुम चालवला आहे.