Breaking-news
… अन् भाजपने लोकशाहीची उडवली खिल्ली : राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/rahul-gandhi-karnatak-3.jpeg)
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. बहुमत नसताना कर्नाटकात सरकार स्थापन करणारा भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर आज सकाळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली.
बहुमत नसतानादेखील भाजप अट्टाहासाने सरकार स्थापन करत आहे. भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे. भाजप आज विजयी जल्लोष करेल, तर दुसरीकडे संपूर्ण देशाला लोकशाहीच्या पराभवाचे दुःख असेल, असे ते म्हणाले.