breaking-newsराष्ट्रिय

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे मंगळवारी पहाटेपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र एक जवान शहीद झाला आहे. य़ाशिवाय जवानांच्या हाती मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व युद्धजन्य सामुग्री देखील लागली आहे.  या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार शोध मोहिम राबवून त्यांना घेरण्यात आले होते.

ANI

@ANI

JeM terrorists Sajjad Maqbool Bhat and Tauseef who were involved in Pulwama terrorist attack (14 Feb) have been neutralized by the security forces in Anantnag encounter today.

१४९ लोक याविषयी बोलत आहेत

आजच्या चकमकीत सज्जाद मकबूल भट आणि तौसिफ  हे दोन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे. सज्जाद याने पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी वापरल्या गेलेल्या वाहनाची व्यवस्था केली होती. तर तौसिफ हा त्याचा हस्तक होता, असे भारतीय सेनेकडून सांगण्यात आले  आहे.

ANI

@ANI

Jammu & Kahsmir: One security personnel has lost his life, two terrorists neutralised, in encounter in Anantnag today; weapons and warlike stores recovered.

५१ लोक याविषयी बोलत आहेत

काल देखील अनंतनाग येथे दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली, ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मागिल काही दिवसांपासून सातत्याने अनंतनाग परिसरात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Jammu and Kashmir: Exchange of fire underway between security forces & terrorists in Anantnag. More details awaited. (Visuals deferred by unspecified time)

३५ लोक याविषयी बोलत आहेत

जवानांनी वघामा भागास वेढा दिला आहे. या ठिकाणी दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता वर्तंवली जात आहे. सोमवारी देखील अनंतनागमध्ये जवानांची या ठिकाणी चकमक झाली होती. ज्यामध्ये भारतीय सेनेचे एक मेजर शहीद झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button