breaking-newsआंतरराष्टीय

अट्टल चोराचे हेलिकॉप्टरद्वारे तुरुंगातून पलायन

पॅरिस – एका अट्टल चोराने चक्क हेलिकॉप्टरच्या मदतीने तुरुंगातून पळून जाण्याचा अचाट प्रसंग फ्रान्समध्ये घडला आहे. रेडोइन फेद या अट्टल चोराने रिओ शहरातील उपनगरातील एका तुरुंगातून, कडेकोट बंदोबस्त असतानाही केवळ काही मिनिटांच्या अवधीत पलायन केले. त्याच्या समवेत तीन सहकाऱ्यांनाही त्याने पळवून नेले आहे. तुरुंगातून पळून जाण्यासाठी वापरलेले हे हेलिकॉप्टर पॅरिसच्या ईशान्येकडील एका उपनगरामध्ये सापडले. तुरुंगातून पळून गेलेल्या गुन्हेगाराच्या शोधासाठी पोलिसांनी संपूर्ण पॅरिसमध्ये मोठी शोधमोहिम सुरू केली आहे.

फेद याने तुरुंगातून पळून जाण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2013 मध्ये त्याने डायनामाईटच्या सहाय्याने स्फोट घडवून तुरुंगातून पलायन केले होते. मात्र काही आठवड्यातच त्याला पुन्हा पकडण्यात आले होते. फेड याने पॅरिसच्या आजूबाजूच्या उपनगरांमध्ये गुन्हेगारांबरोबर स्थलांतर करत आतापर्यंतचे आयुष्य काढले होते.

मे 2010 मध्ये एका दरोड्याच्या गुन्ह्यासाठी फेड याला एप्रिल महिन्यात 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दरोड्याच्या प्रयत्नात झालेल्या गोळीबारामध्ये त्याच्या हातून एक पोलिस कर्मचारी मारला गेला होता.

सुमारे दशकभराच्या तुरुंगवासानंतर त्याला त्याच्या गुन्ह्याबाबत पश्‍चाताप झाला आणि नव्याने आयुष्य जगण्याची त्याची ईच्छा बघून त्याची पॅरोलवर सुटकाही झाली होती. त्याने काही टिव्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि काही पुस्तकांचे लेखन सहाय्य म्हणूनही काम केले होते. “स्कारफेस’ आणि “हीट’ या अमेरिकेतील सिनेमांमधील युक्‍त्यांमधून त्याला गुन्ह्यांची प्रेरणा मिळत असायची.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button