breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

धन्य झालो! अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर TMC खासदाराला आलं हसू

 पश्चिम बंगाल |

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून तृणमूल काँग्रेस बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेस २०० चा आकडा पार करत असून दुसरीकडे भाजपाची मात्र १०० चा आकडा गाठतानाही दमछाक होताना दिसत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरल्यानंतर ममता बॅनर्जी मात्र विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहे. दरम्यान निवडणुकीआधी २०० चा आकडा पार करण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तृणमूल काँग्रेसने खिल्ली उडवली आहे. “कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंगालमध्ये भाजपाची भगवी लाट आल्याचे संकेत मिळाले. पहिल्या टप्प्यात तिथे ३६ जागांवर मतदान झाले. त्यापैकी २६ जागा भाजपाला मिळेल आणि इतर टप्प्यात २९४ सदस्यीय पश्चिम बंगालमध्ये भाजपला २०० हून अधिक जागा मिळतील,” असं अमित शाह यांनी म्हटलं होतं. तृणमूल काँग्रसचे नेते डेरेक ओ’ब्रायन यांनी अमित शाह यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. यावेळी त्यांनी कोणतंही भाष्य न करता फक्त स्माईली टाकत खिल्ली उडवली आहे.

अमित शाह यांच्या या वक्तव्यावर भाजपातून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणारे यशवंत सिन्हा यांनीदेखील उपरोधिक टोला लगावला होता. यशवंत सिन्हा यांनी माझ्या माहितीप्रमाणे भाजपा २९४ पैकी ३०० जागा जिंकणार असल्याचं उपरोधिक ट्विट केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की, “बंगाल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपा ३० पैकी फक्त २६ जागांवर विजय मिळवण्याचा दावा केल्याबद्दल आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभारी आहोत. माझ्या माहितीप्रमाणे भाजपा संपूर्ण ३० आणि २९४ पैकी ३०० जागांवर विजय मिळवणार आहे”.

वाचा- भाजपा विरोधकांचा ममता दीदींवर कौतुकाचा वर्षाव

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button