breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

भाजपच्या निष्ठावंताने घेतला 3 वर्षांसाठी राजकीय संन्यास, कोण आहे हा कार्यकर्ता…

मावळ – मावळ तालुक्यातील ओवळे गावचे युवा नेते -शिवभक्त अजित शिंदे यांनी राजकारणातून 3 वर्षासाठी संन्यास घेतला आहे.अजित शिंदे हे वयाच्या 18 व्या वर्षापासून भाजपाचे कट्टर तसेच निष्ठावंत कार्यकर्ते होते. परंतु त्यांनी 2023 च्या ओवळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ओवळे भाजपाकडे थेट जनतेतुन सरपंच पदासाठी उमेदवारी मागितली होती.परंतु उमेदवारीवरून ओवळे भाजपा कोअर कमिटी व अजित शिंदे यांच्यामध्ये मतभेद झाले. व त्यांना भाजपकडून डावलले गेले. त्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीने शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली.

त्यामुळे कुठेतरी शिंदे यांना आपला अपमान झाला, असे वाटू लागले. म्हणून शिंदे यांनी स्वतःचा स्वतंत्र पॅनेल तयार करून ही निवडणुक लढविण्याचा विचार केला. परंतु नंतर शिंदे यांच्या लक्षात आले की,आपण एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असताना देखील आज भाजपाने आपल्याला मानसन्मान दिला. भाजपामुळे मला ओळख मिळाली. भाजपाने माझे नाव मोठ केल. आज मला फक्त ओवळे, मावळमधील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक लोक ओळखतात. ते केवळ मी भाजपाचा कार्यकर्ता असल्यामुळेच. त्यामुळेच पक्षाने मला उमेदवारी दिली नाही म्हणून मी नाराज न होता. जोमाने कामाला लागतो.

ज्या पक्षाने माझ्यासाठी एवढे केलं आहे. त्या पक्षाच्या तसेच त्या पक्षाच्या लोकांच्या विरोधात मला ही ग्रामपंचायत निवडणुक लढवायची नाही. हा निर्णय शिंदे यांनी घेतला. व त्यामुळे ही निवडणुक लढवणार नसल्याने अखेर शिंदे यांनी राजकारणातुन संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button