TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचं गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सोनाली फोगाट  यांचं गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. टिकटॉर स्टार राहिलेल्या सोनाली फोगाट यांना भाजपने उमेदवारी दिली होती. हरियाणातल्या आदमपूर जिल्ह्यातल्या हिसार मतदारसंघातून भाजपने फोगाट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यांच्यासमोर २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई यांचं आव्हान होतं. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही त्यांचा निवडणुकीत पराभव झालेला होता. निवडणुकीदरम्यान, त्या टिकटॉक आणि युट्यूबवरील व्हिडिओंसाठी खूपच लोकप्रिय होत्या. सोनाली फोगाट यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं.

दरम्यान, सोनाली फोगट यांनी मृत्यूच्या काही वेळापूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यासोबतच त्यांनी ट्विटर अकाऊंटवरील प्रोफाइल पिक्चरही बदलला होता. त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसोबत त्या गोव्याला गेल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. स्थानिक प्रशासन त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहे, पोलीस अधिक तपास करत आहे. भाजप हरियाणा प्रदेशच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा संघटनेसाठी व्हावा, यासाठी भाजप प्रयत्नशील होतं. मात्र संघटनबांधणीचं काम मोठं असल्याने सोनाली यांना त्याकामी फारसं यश आलं नाही.

बिग बॉस-१४ या रिअॅलिटी शोचा देखील सोनाली फोगाट भाग होती. या शोदरम्यान तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे अन् गौप्यस्फोट केले. सोनालीचे पती संजय फोगट यांचे २०१६ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती आला होता, पण काही कारणांमुळे हे नाते पुढे जाऊ शकले नाही, असं सांगताना तो व्यक्ती कोण होता, हे सांगण्यास मात्र सोनाली यांनी नकार दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button