breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘Yes बँके’च्या माजी संचालकांच्या घरावर ईडीची धाड, लुकआऊट नोटीस जारी

मुंबई | येस बँकचे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांच्या घरावर काल रात्री ईडीने (प्रवर्तन निदेशालय) धाड टाकली. तसेच राणा कपूर यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांना लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ते आता देश सोडून जाऊ शकत नाहीत.

राणा कपूर यांचे वरळीमध्ये घर आहे. वरळीतील समुद्र महल या बिल्डिंगमध्ये ते राहतात. ईडीने काल रात्री अचानक राणा यांच्या घरावर धाड टाकली. रात्रभर ईडीने त्यांची चौकशी केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली आहे.

राणा यांनी येस बँकेतून स्वत: च्या मर्जीने जवळच्या लोकांना मोठे कर्ज दिले आहे. 2017 मध्ये येस बँकेने 6 हजार 355 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. याबद्दल ईडीकडून चौकशी सुरु आहे, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, येस बँकेला वाचवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. 3 एप्रिलपर्यंत ग्राहक 50 हजार रुपये काढू शकत नाही. तसेच शिक्षण, आरोग्य आणि लग्न असेल तरच तुम्हाला अधिक किंमत दिली जाऊ शकते. 3 एप्रिलपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. येस बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीआयने पुढच्या एक महिन्यासाठी बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला टेकओव्हर केले आहे. बँकेला 3 एप्रिलपूर्वी पुनर्गठन केले जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button