breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

मोठी बातमी! 27 जूनला होणारी UPSC परीक्षा रद्द, नवी तारीख जाहीर

 

नवी दिल्ली – कोरोनाने देशभरामध्ये थैमान घातलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकाडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने 27 जून रोजी होणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता रद्द झालेली परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र ऑक्टोंबरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव अशाच प्रकारे वाढत असला तर त्यावेळीही परीक्षेबाबत काही वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाकडून 27 जून रोजी IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्राथमिक परीक्षा आयोजित केली होती.

UPSC कडून भारतीय प्रशासकीय सेवा(IAS), भारतीय पोलीस सेवा(IPS) आणि भारतीय विदेश सेवा(IFS) मध्ये अधिकारी निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्यात येते. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे एकून 712 पदं नागरी सेवा अंतर्गत परीक्षा घेऊन भरली जाणार होती. यासाठी 27 जून 2021 रोजी प्राथमिक परीक्षा होती. 4 मार्च 2021 रोजी या परीक्षेसाठी फॉर्म जारी केले होते. प्राथमिक परीक्षेत पास होणाऱ्या ज्या उमेदवारांना निवडलं जातं त्यांनाच मुख्य परीक्षेला बसला येतं.

दरम्यान, कोरोनामुळे मुलांनादेखील मोठा फटका बसला आहे. MPSC देेणारे विद्यार्थी यांचीही परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यासोबतच आता महाराष्ट्र बोर्डाची 10 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button