breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अरुण देशमुख यांचा भाजपाला पाठिंबा

महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना देणार साथ

चिंचवड पोटनिवडणुकीत सोसायटीधारक भाजपासोबत

पिंपरी : वाकड परिसरात भारतीय जनता पक्षाची निवडणूक नियोजन संदर्भात कोअर समितीची महत्वाची बैठक महाराष्ट्र भाजपाचे सचिव अमित गोरखे याच्या मुख्य उपस्थितीत पार पडली. यामध्ये चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुक संदर्भातील महत्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व ज्येष्ठ आणि अनुभवी देखील उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे मुख्य प्रवक्ते व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ व अनुभवी अरुण देशमुख हे आपले मत मांडत म्हणाले की “गेली ५० वर्षे माझ्यासारखे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षासाठी काम करीत आहेत, अगदी आणीबाणीच्या काळात देखील आमच्यावर अटक होण्याची वेळ आली तरीदेखील न डगमगता आम्ही पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिलो आणि इथून पुढे देखील भारतीय जनता पक्षासोबतच कायम राहणार आहे. यासाठी आम्ही व सर्व सोसायटीधारक मिळून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहोत व त्यांच्या विजयामध्ये माझ्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याचे व पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन म्हणून सोसायटीधारकांचे नक्कीच महत्वाची भूमिका असेल.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button