breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुंबईतून मोठी बातमी; रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, निकालानंतर अजून एक ट्वीस्ट

मुंबई  : मुंबई उत्तर -पश्चिम लोकसभा मतदार संघात बिग फाईट झाली होती. शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यात कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. पण हा निकाल उद्धव ठाकरे गटाने अजून ही स्वीकारलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाईची तयारी ठाकरे सेनेने सुरु केली आहे. त्याचवेळी या प्रकरणात एक मोठा ट्वीस्ट आला आहे. त्यावरुन आता मोठे वादंग उठले आहे.

मतमोजणीबाबत ठाकरे सेनेचे अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मतदारसंघातील निकाल लागला असला तरी अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे.

वायकरंच्या मेहुण्याला मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन EVM मशीनला जोडलेला होता. याच मोबाईलवर आलेल्या OTP ने EVM मशीन करण्यात अनलॉक आली होती. पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे. मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला मनाई असताना हा प्रकार घडला.4 जून रोजी नेस्को सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी हा फोन जप्त केला आहे. तो आता न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. प्रकरणात गुरव आणि पंडीलकर यांना ४१(अ) ची नोटीस बजावली आहे. त्यांना हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.

प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता, हे समोर येईल. वनराई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून एंट्री पाँईट, स्ट्राँग रुम अशा महत्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज मागितले आहे. त्याआधारे पोलीस पुढील तपास करणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button