breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

यंदाचा गणेशोत्सव मर्यादित साजरा करावा, ऑनलाईन दर्शनासाठी सोशल माध्यमाचा वापर करावा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा. राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लागू केलेल्या नियमांची काटेकोरपणे अमंलबजावणी करावी. मर्यादित मंडप व सजावट करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका व पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील गणेश मंडळांना करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात सोमवारी (दि. १७) पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पोलिस अधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शनिवार (दि. २२) पासून सुरू होणारा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याबाबत राज्याच्या गृह विभागाने आदेश दिले आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक झाली. मोठ्या मंडळांनी ऑनलाईन दर्शन देण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी फेसबुक, यु ट्यूब, संकेतस्थळ याचा वापर करावा.

स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे. प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छिणारे नागरिक नियमांचे पालन करतात का, याबाबत दक्षता घ्यावी. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावे, त्यांना सॅनिटायझरची सोय करावी, तोंडाला मास्क लावल्याची खात्री करण्यात यावी, अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button