breaking-newsTOP Newsमहाराष्ट्रव्यापार

बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Bank Holidays in March 2024  : तुम्ही जर मार्चमध्ये बँकेचे व्यवहार करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मार्च महिन्यात अनेक सण येतात. त्यामुळे या दिवशी बँकेला सुट्टी असेल. मार्च महिन्यात देशभरातील बँका १४ दिवस बंद राहणार आहेत. ज्यामध्ये फक्त ५ रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असणार आहे. होळीसोबतच मार्च महिन्यात महाशिवरात्री आणि गुड फ्रायडे सारखे सण येतात. त्यामुळे या दिवशी बॅंका बंद असणार आहे. त्यामुळे बँकेतील व्यवहाराचं योग्य नियोजन करा, अन्यथा तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

भारतातील बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात, काही राज्य-विशिष्ट सुट्टीसाठी बंद असतात. आरबीआयच्या सुट्टीच्या यादीनुसार मार्चमध्ये बँका १४ दिवस बंद राहतील. तसेच सणांच्या दृष्टिकोनातून मार्च महिना हा खूप महत्त्वाचा आहे. मार्च महिन्यात महाशिवरात्री सोबतच होळी हा देखील सण आहे. दुसरीकडे, गुड फ्रायडे देखील या महिन्यात येतो. याचा अर्थ या तीन सणांमध्ये संपूर्ण देशात बंद राहणार आहे. तसेच, काही राज्यांमध्ये होळीचा सण नंतरच्या तारखेला साजरा केला जातो. छप्पर कुट आणि बिहार दिनानिमित्त त्या राज्यांमध्ये आणि शहरांमधील बँकांना सुट्टी असेल. याशिवाय यावेळी फक्त ५ रविवार आहेत. फक्त दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी बँकांना सुट्टी असेल. म्हणजेच मार्च महिन्यात देशभरातील बँका १४ दिवस बंद राहतील.

हेही वाचा – ‘शिवगर्जना’महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या दिवशी बँका बंद असणार

–  १ मार्चला चापचर कुटमुळे मिझोराममधील आयझॉल शहरात बँकांना सुट्टी

  ३ मार्च, रविवार, देशातील सर्व राज्यांमध्ये बँक सुट्ट्या

  ८ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त देशातील सर्व राज्यांमध्ये बँका बंद आहेत.

  ९ मार्च हा दुसरा शनिवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकिंग सुट्टी आहे.

  १० मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे.

  १७ मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे

  २२ मार्च रोजी बिहार दिनानिमित्त बिहारमध्ये बँकांना सुट्टी.

   २३ मार्च हा चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकिंग सुट्टी आहे.

  २४ मार्च रविवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँक सुट्टी

  २५ मार्चला होळीनिमित्त देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे.

  २६ मार्च भुवनेश्वर, इम्फाळ आणि पाटणा येथे बँकांना सुट्टी.

२७ मार्च होळीनिमित्त बिहारमधील सर्व शहरांमध्ये बँकांना सुट्टी.

–  २९ मार्चला गुड फ्रायडेनिमित्त देशभरात बँकांना सुट्टी.

–  ३१ मार्च रोजी रविवार असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button