breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवडमधील युवकांसाठी परशुराम आल्हाट यांचा आदर्श

सार्वजनिक गणेशोत्सवात वर्गणीवर खर्च न करता ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ मध्ये मदत…

पिंपरी| प्रतिनिधी


मोशीचे सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना युवानेते परशुराम आल्हाट पिंपरी-चिंचवडमधील युवकांसाठी नवीन आदर्श ठरत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये अनेक लघुउद्योग, व्यवसाय बंद होते त्यामुळे महाराष्ट्र राज्यावर आर्थिक संकट ओढवल आहे. तसेच आता गणेशोत्सव दोनच दिवसांवर येऊन ठेपला आहे.दरवर्षी पुण्यात गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशासह दिमाखात साजरा होणारा सण आपण पाहत आलो आहोत. पण यंदा कोरोनाच्या या सावटामुळे दरवर्षी सारसंगीत साजरा होणारा गणपती उत्सव बऱ्याच मर्यादा आणि अटींसह साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे नक्कीच सर्वच गणेश भक्तांचा आणि गणेश मंडळांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे यंदा दरवर्षी गणेशोत्सवासाठी घेण्यात येणारी वर्गणी सुद्धा नसणारं. किंवा जे सामाजिक कार्यकर्ते , नागरिक स्वत:हून जी रक्कम दान म्हणून किंवा वर्गणी म्हणून देत होते ती देखील आता घेतली जाणार नाही .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामध्ये’ जास्तीत जास्त नागरिकांनी

कोरोनाबाधितांना मदत व्हावी यासाठी त्यांना जमेल त्या पद्धतिने निधीच्या स्वरुपात मदत करण्याच आवाहन केले होते. त्याच आवाहनाला प्रतिसाद म्हणून दरवर्षी गणपती मंडळांना देण्यात येणारी वर्गणीची रक्कम यंदाच्या वर्षी न देता ती रक्कम ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्षा’ मध्ये जमा करून पुन्हा एकदा नवीन आदर्श सर्वांपुढे ठेवण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना नेते परशुराम आल्हाट यांनी केलं आहे.एवढंच नाही तर त्यांनी सर्व समाजसेवकांना, नेतेमंडळी, व गणेश मंडळांनाही इतर खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करा व सरकारला मदत करा असे आवाहनं केले आहे.


परशुराम आल्हाट यांच्यासह त्यांच्या पत्नी रुपाली आल्हाट या देखील समाजसेवा सातत्याने करत आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा कोरोनाचा शिरकाव मोशी परिसरात झाला तेव्हापासून हे दांपत्य सतत जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मग ती परिसरात फवारणी असेल, रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्यांचे वाटप असेल किंवा सॅनिटाईझर फवारणी असेल अशा माध्यमातून जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या कमी करण्याचा आणि जनतेला सतत सुरक्षित ठेवण्याचा या दांपत्याचा प्रयत्न असतो .

मात्र, कोरोनाशी लढता…लढता आल्हाट दाम्पत्य स्वत: कोरोनाबाधित झाले. दोघे ही कोरोनावर उपचार घेऊऩ आता सुखरुप घरी परतले आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी परशुराम आल्हाट यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला, ते म्हणाले “भाऊ, आमच्या वडिलांची प्रकृती गंभीर झाली आहे. ते ‘लाईफलाईन’ या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून तातडीने ‘ओ’ पॉझिटिव्ह प्लाझ्मा पाहिजे, खूप लोकांना संपर्क केला असता कोणीही पुढे यायला तयार नाही”. हे ऐकल्यावर परशुराम यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांच्या बंधूशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. त्यांच्या बंधूने प्लाझ्मादाता यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेऊन प्लाझ्मा उपलब्ध केला व स्वतः PPE किट घालून त्या रुग्णाजवळ जाऊन त्या रुग्णाची विचारपुसही केली. तसेच तुम्हाला कशाचीही गरज भासल्यास तात्काळ आम्हाला संपर्क करा असा शब्द आणि विश्वासही त्यांनी दिला.


कोरोना काळात सर्वसामान्य लोकांसाठी धडपणारे आल्हाट दांपत्य स्वत: कोरोनाशी झूंज देत असले तरीही त्यांनी जनतेची सेवा, आणि जनतेची काळजी घेणं विसरले नाही हे यावरून नक्कीच दिसून येते. त्यांच्या कार्याचे मोशी आणि परिसरातून खूप कौतूक होत आहे. स्वतः कोरोनाबाधित असताना सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारा परशुराम आल्हाट हे खऱ्या आयुष्यातले लढवय्या शिलेदार ठरले आहे… फक्त लढवय्याचं नाही तर त्यांनी युवा मंच समोर एक नविन आदर्श घालून दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button