TOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘बेस्ट’ची विजेवर धावणारी वातानुकूलित दुमजली बस लवकरच

मुंबई : विजेवर धावणारी दुमजली वातानुकूलित बस सप्टेंबरपासून सेवेत दाखल करण्याचा निर्णय ‘बेस्ट’ उपक्रमाने घेतला होता. मात्र, पुण्यातील ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया सेंटरमध्ये (एआरएआय) या बसची अद्याप चाचणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या महिन्यात बस सेवेत दाखल होणार आहे.

प्रवासी वाहतुकीची अधिक क्षमता असलेल्या दुमजली वातानुकूलित बस टप्प्याटप्प्याने सेवेत आणण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला असून अशा ९०० बस भाडेतत्त्वावर ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. पुण्यातील ‘एआरएआय सेंटर’मध्ये विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बसच्या चाचणीला सुरुवात झाली असून सप्टेंबरमध्ये या बस सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. पहिल्या टप्प्यात चारपैकी तीन बस सेवेत येणार होत्या. मात्र त्यालाही विलंब झाला आहे. या महिन्यात दुमजली वातानुकूलित बस प्रवाशांच्या सेवेत येईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

वाहकांना संपर्कासाठी व्यवस्था..

दुमजली वातानुकूलित बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असून ते उघड किंवा बंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांसह बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्थाही आहे. या बसची ८० मिनिटांत ‘चार्जिग’ पूर्ण होते. क्षमता ६६ असून उभ्याने दहा जण प्रवास करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button