breaking-newsपुणेमहाराष्ट्र

टोळक्‍याची पोलिसांना मारहाण

  • डीजे लावण्यास विरोध केल्याने कृत्य 

पिंपरी – डीजे लावून आरडाओरड करणाऱ्या तरुणांना रोखणाऱ्या पोलिसांना तरुणांनी धक्काबुक्की केली. तसेच त्यांचे कपडे फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार बुधवारी (दि. 25) पहाटे तीनच्या सुमारास चिखली मधील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर घडला.

पोलीस शिपाई अशोक ठकावरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार इमामुद्दीन तय्यबअली इनामदार (वय-20, रा. दौंड), योगेश रमेश माने (वय-24, रा. गौतम नगर, दौंड), मोहम्मद सईद तय्यबअली इनामदार (वय-24, दौंडे), विकास पांडुरंग डाळिंबे (वय-25, रा. जगदाळे वस्ती, दौंड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास राठी हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात डीजे चालू आहे. खूप गोंगाट सुरु असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्रपाळीसाठी असलेले पोलीस शिपाई अशोक ठकावरे आणि त्यांचे सहकारी पोलीस शिपाई गेंगजे घटनास्थळी पोहोचले. राठी हॉटेलमध्ये तिस-ऱ्या मजल्यावर रूम नंबर 305 च्या मोकळ्या जागेत मोठ्या आवाजात स्पीकर लावून आरडाओरड करत असल्याचे आढळले. या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने अशोक यांनी त्यांना आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावर वरील चार आरोपींनी “तू कोण रे, तुझा संबंध काय’ अशा शब्दात अरेरावी केली. तसेच गेंगजे यांचा मोबाईल फोन भिंतीवर आपटला. दोन्ही पोलिसांचे गणवेश ओढून त्यांना धक्काबुक्की केली. पोलीस शिपाई अशोक करीत असलेल्या शासकीय कामात तरुणांनी अडथळा आणल्याबद्दल चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button