पिंपरी / चिंचवड

जागेची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या जागा मालकाला मारहाण ; दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

जागेत वाढलेले गवत व वेल काढण्यासाठी गेलेल्या एकाला तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना 22 मे रोजी दुपारी साडेबारा वाजता ज्योतीबानगर तळवडे येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अक्षय संजय कोतवाल, प्रशांत संजय कोतवाल, सागर एकनाथ कोतवाल (सर्व रा. ज्योतीबानगर तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रशांत आणि सागर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पराग जयवंत जांभूळकर (वय 42, रा. निगडी प्राधिकरण) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे वडील ज्योतीबानगर तळवडे येथे त्यांच्या जागेत वाढलेले गवत आणि वेल काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी ही जागा आमच्या मालकीची आहे असे म्हणत फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. डोळ्यावर मार लागल्याने फिर्यादी अण्णा दिसण्यासाठी त्रास होत आहे. त्यांनतर आरोपींनी फिर्यादी यांना रस्त्यावर नेऊन पुन्हा मारहाण केली. आरोपी सागर याने ‘मी कोणत्या प्रकारचा गुंड आहे हे तुला दाखवतो’ असे म्हणत अन्य आरोपींना ‘याला इथेच खलास करून टाका’ असे म्हणाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button