ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉक्टरला मारहाण करत दवाखाना बंद करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी

पिंपरी  | डॉक्टर, त्यांचा भाऊ आणि भावाच्या पत्नीला मारहाण करत दवाखाना बंद करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 17) सकाळी दहा वाजता देहूरोड परिसरात घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. रोहित भागाजी कणसे (वय 36, रा. रावेत) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कायझर आझाद व त्यांचा मुलगा साहिल परवेझ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कायझर मंगळवारी सकाळी फिर्यादी यांच्या क्लिनिक शेजारी रस्त्यावर खडी पसरवत होता. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हातातील खो-याने, झाडूने, चपलेने मारहाण केली. कायझर याने शिवीगाळ करून दमदाटी केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचे भाऊ आणि भावजय आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. तसेच ‘तुमचा दवाखाना बंद करतो. तुम्हाला मारून टाकतो’ अशी धमकी दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button