breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची महाराष्ट्र एकीकीरण समितीबाबत जीभ घसरली

मुंबई : सध्या कर्नाटकात निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते देखील प्रचारासाठी कर्नाटकात गेले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद फार जुना आहे. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची महाराष्ट्र एकीकीरण समितीबाबत जीभ घसरली आहे.

बसवराज बोम्मई म्हणाले की, निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती लोकांचे माथे बिघडविणयाचं काम करीत आहेत. बेळगावच्या जनतेला हे सर्व ठाऊक आहे. तेथील लोकच त्यांना उत्तर देतील. बेळगावात राष्ट्रीय पक्षाच्या प्रचारासाठी कर्नाटकातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावलं जात आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना आहे. आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट यासारखे कन्नड भाषिक भाग कर्नाटकात विलीन करावेत अशी आमची मागणी आहे, असं बसवराज बोम्मई म्हणाले. ते हुबळी येथे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button