breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बंडातात्या कराडकर यांनी अजितदादा, सुप्रियाताईंची माफी मागावी – संजोग वाघेरे पाटील

  • राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे पिंपरीत निषेध आंदोलन

पिंपरी चिंचवड |प्रतिनिधी

राजकीय व्देषापोटी बंडातात्या कराडकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि आमच्या दोन्ही नेत्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या विरोधात आणखी आक्रमकपणे आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील दिला आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी 2022 रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आांबेडकर पुतळ्या समोर निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेत निषेध नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनासाठी पक्ष प्रवकते फजल शेख, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष युवक प्रदेश रविकांत वर्पे, महीला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका सुलक्षणा शिलवत, स्वाती माई काटे, माई काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, माजी नगरसेविका शमीम पठाण, संगीता जाधव, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, काळुराम पवार, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदीप चिंचवडे, माऊली सुर्यवंशी, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, सोशल मीडिया अध्यक्ष समीर थोपटे, अल्पसंख्याक अध्यक्ष युसुफ शेख, सेवादल अध्यक्ष महेश झपके, गिरीष कुटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सामाजिक न्याय अभिजित आल्हाट, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगीता कोकणे, अपंग सेल अध्यक्षा संगीता जोशी, शुक्रुल्ला पठाण, प्रसाद कोलते, अकबर मुल्ला, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, सचिन वाल्हेकर, कार्याध्यक्ष सामाजिक न्याय बाळासाहेब पिल्लेवार, अक्षय माछरे, श्याम जगताप, पदवीधर शहराध्यक्ष माधव पाटील, पिंटू जवळकर, विष्णू शेळके, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, झोपडपट्टी सेल अध्यक्षा सुनीता अडसुळ, दिनेश पटेल, विक्रम पवार, उपाध्यक्ष संतोष वाघेरे, तृतीयपंथी सेल अध्यक्ष किरण वाघ, बाळासाहेब जगताप यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button