पिंपरी / चिंचवडपुणे
बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी, चिंचवडमध्ये पकडले शेकडो किलो गोमांस
पिंपरी | प्रतिनिधी
कोंढवा येथे गोवंश जनावरांची कत्तल करून ते पिंपरी चिंचवड येथे विक्रीसाठी आणलेल्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. बजरंग दल आणि पिंपरी पोलिसांनी ही कारवाई रविवारी (दि. 2) सकाळी केली आहे. यात शेकडो किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे.
पुणे शहरातील कोंढवा येथे गाई, बैल अशा गोवंशाची कत्तल करून ते गोमांस एका टेम्पोतून पिंपरी चिंचवड येथे आणले असल्याची माहिती बजरंग दलच्या स्वयंसेवकांना मिळाली. याबाबत पोलिसांना माहिती देऊन रविवारी सकाळी कारवाई करण्यात आली.
पिंपरी येथील गांधीनगर मधील एका दुकानात सुमारे अडीचशे किलो गोमांस आढळले आहे. तर आनंदनगर, चिंचवड येथील एका दुकानात सुमारे अडीचशे किलो गोमांस आढळले आहे. दोन्ही दुकानांमध्ये कोंढवा येथील एका व्यक्तीने हे गोमांस आणले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.