अध्यात्म । भविष्यवाणी
आज माघी गणेश जयंती! ‘अशी’ करा बाप्पाची आराधना; वाचा शुभ मुहूर्ताची अचूक वेळ
![Today is Maghi Ganesh Jayanti! Worship Bappa 'like this'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Today-is-Maghi-Ganesh-Jayanti-Worship-Lord-Ganesha-in-this-way-780x470.jpg)
Ganesh Jayanti | फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच आज १ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती आहे. माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थीदेखील साजरी केली जाते. या दिवशी बाप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो.
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी आज १ फेब्रुवारीला आहे. 1 फेब्रुवारीला सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी शुभ मुहूर्ताची वेळ सुरु होणार आहे. तर २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहील.
हेही वाचा : १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? बजेटमध्ये केंद्र सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत
या काळात भगवान गणेशाची विधीवत पूजा केली जाते. १ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांपासून सुरु होणार आहे. तर दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे.