breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

Australian Open 2022: ऍशले बार्टीनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं

ऑस्ट्रेलियन टेनिसपटू ऍशले बार्टीनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केलीय. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिलेला एकेरीच्या अंतिम फेरीत ऍशले बार्टीनं अमेरिकेच्या डॅनियल कॉलिन्सचा  पराभव करून किताबावर नाव कोरलंय. ऍशले बार्टी आणि डॅनियल कॉलिन्स यांच्या शनिवारी खेळला गेलेला अंतिम सामना रोमांचक ठरला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं विजेतेपदासाठी दोघांत चुरशीची स्पर्धा झाली. अखेर बार्टीनं बार्टीनं उत्कृष्ट खेळ दाखवत विजयाची नोंद केली. यासाठी ऑस्ट्रेलियाला अनेक वर्ष वाट पाहावी लागलीय.

या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये एशले बार्टी 5-1 नं पिछाडीवर गेली. त्यानंतर तिनं शानदार पुनरागमन केलं आणि सामना 6-3, 7-6 असा जिंकला. ऑस्ट्रेलियन ओपन एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी बार्टी ही 1980 मध्ये वेंडी टर्नबुलनंतरची पहिली ऑस्ट्रेलियन महिला होती. तसेच 1978 मध्ये ख्रिस ओ’नीलनंतरची पहिली ऑस्ट्रेलियन चॅम्पियन ठरली आहे. 25 वर्षीय बार्टीच्या नावावर आता तीन मोठी विजेतेपदे जिंकण्याचा विक्रम आहे. तिनं गेल्या वर्षी विम्बल्डन आणि 2019 मध्ये फ्रेंच ओपन जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

ऍश बार्टी महिला टेनिस असोसिएशनद्वारे एकेरीमध्ये जगातील पहिल्या क्रमांकावर आहे. तिच्या नावावर अनेक व्रिक्रमांची नोंद आहे. तिनं उपांत्य फेरीत अमेरिकेच्या मॅडीसन कीजला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळं तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button